टॉप बातम्या

सावरखेडच्या पोराचं पुण्यात सत्कार अमित ढोबळे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार.!


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

राळेगाव : सामाजिक कार्यात सक्रिय असलेले कोरोना काळात स्वतच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अमित सूर्यभान ढोबळे यांना राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारतच्या वतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सामजिक कार्याच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षाहुन अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी कोरोना काळात आदिवासी भागातील लोकांना विविध स्वरूपाची मदत करून दिले. सावरखेड परिसरातील अपघातग्रस्त, गोरगरिब, अपंग, शेतकरी शेतमजुरी, करणाऱ्यासाठी सैदव तत्पर्य असतात.
या कामाबद्दल अनेक सामाजिक संस्थाकडून त्यांचा सन्मान केला आहे. मात्र भारत सरकार नोंदणीकृत संस्था राष्ट्रभक्ती जनविकास संघटने मार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडु, लातूर विभाग सहनिबंधक ज्योती मेटे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी , पद्मश्री विनायकराव पोपट कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेचे संस्थापक सुनील गोरे व पदाधिकाऱ्याने केली. या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();