टॉप बातम्या

ट्रॅक्टर सोडण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारे "चार" एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

झरी जामणी : एसीबीने कारवाई करत मंडळ अधिकारी, दोन तलाठी व पोलीस रक्षकास ५० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले. मुकुटबन येथील चार लोकसेवक अमरावती अँटी करप्शन ब्युरो च्या सापड्यात अडकल्याने वणी उपविभागीय क्षेत्रात कमालीची खळबळ उडाली आहे.

मंडळ अधिकारी बाबुसिंग राठोड, तलाठी नमो सदाशिव शेंडे, खातेरा, तलाठी रमेश राणे, मुकुटबन व संजय रामचंद्र खांडेकर पोलीस नाईक मुकुटबन पोलीस स्टेशन असे त्यांची नावे आहे. या चारही लोकसेवकांना लाचेची मागणी त्यांना भोवली आहे.

मुकुटबन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस आणि महसूल चे तीन कर्मचारी यांनी पाच महिन्यापूर्वी वाळू चे ट्रॅक्टर सोडण्यासाठी तडजोडअंती पन्नास हजाराची मागणी केली होती. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व बाबींची पडताळणी केली. लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी अनेकदा सापळा रचण्यात आला, मात्र चतुर मागणीखोर गवसत नव्हते. अखेर अँटी करप्शन ब्युरो (ACB) ने केलेल्या पडताळणी व लाचेची मागणी करून लाच स्वीकारणे मान्य केले, याबाबत पक्की खात्री पटल्यानंतर या चौघांना दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी ताब्यात घेतले.

सदर कारवाई अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेश सपकाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट,अब्दुल वसीम,सचिन भोयर, महेश वाकोडे, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, व संजय कांबळे यांनी केली.

दरम्यान, आपल्या परिसरात कोणी अशाप्रकारे मागणी किंबहुना लाच घेत मागणी करित असल्यास जवळच्या संबंधित विभागाला किंवा ACB कार्यालयाला संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();