टॉप बातम्या

अज्ञात चोरट्यांनी टिनाचे शेड कापून मारला 'डल्ला'

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
मारेगाव : येथील शेतात असलेल्या टीनाचे शेड मधील कापसावर चोरट्यांनी 'डल्ला' मारल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारच्या मध्यरात्री घडली.

शहरातील तानबाजी श्रीरामे यांची शेती मारेगाव शिवारात आहे. शेतात असलेल्या टिनाच्या शेड कापून साडेतीन क्विंटल वर मध्यरात्री हात साफ केल्याने शेतकऱ्याचे तीस हजाराच्या जवळपास आर्थिक नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 
      

मारेगाव तालुक्यात भुरटे चोर सक्रिय झाले असून कापूस चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या प्रकार समोर येत आहे. दिवसागणिक शेतातील साहित्य, पिक चोरीचे प्रकार घडत असतांना शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत शेतकरी तानबाजी श्रीरामे यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. 

मारेगाव तालुक्यातील कापूस चोरीचा वाढता आलेख पाहता चोरीच्या घटनेत सतत वाढ होत असतांना, या भुरट्या चोरट्यांना पकडण्यास पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरत आहे अशी शेतकऱ्यातून ओरड आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();