टॉप बातम्या

पात्र घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या - सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील रेती घाट लिलाव झाले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने दिलेले घरकुल योजनेचे घर बांधकाम करायचे कसे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.त्यामुळे शासकीय स्तरावरून पात्र घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

मारेगाव तालुक्यातील अनेक रेती घाट वाळू तस्करांनी गिळंकृत केल्याचे सर्वश्रुत आहे. परिणामी सर्व सामान्यांना रेती मिळणे कठीण झाले, चढया दरात रेती घ्यावी लागत असल्याने तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना योजनेच्या बांधकामाचा बजेट कोलमडल्याने प्रशासनाने रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तालुक्यातील लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. अशा ईशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना रेती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी, मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, यांच्या नेतृत्वात चंद्रकांत धोबे, चंदू जवादे, प्रवीण नान्हे, दिलीप आत्राम, पांडुरंग देवाळकर, माणिक पांगुळ, संजय मत्ते, मारोती तुराणकर, लटारी बोथले, दादा बोकडे, किशोर पिदूरकर, सचिन पचारे, संजय बोकडे, प्रफुल महाजन, सुरेश किनाके, जगदीश ठेंगणे आदींनी केली. यावेळी असंख्य सरपंच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();