टॉप बातम्या

शस्त्रधारी युवकास गायकवाड परिसरामध्ये अटक


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कलम 37 (1)(3) अन्वये 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधित आदेश लागू असतांना शहरातील गायकवाड फैल येथील युवक हातात शस्त्र घेऊन परिसरात धुमाकूळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून, हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक केली.

साहील संजय कामटकर (19) असे शस्त्रधारी आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याचे जवळून धारदार लोखंडी सत्तूर जप्त करीत त्याचे वर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4,25 व सह कलम 135 म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पावन बन्सोड, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, एसडीपीओ संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिन्द्र कुमार भारती, सागर सिडाम, पुरुषोत्तम डडमल यांनी केली.

पुढील तपास सपोनि माधव शिंदे करीत आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();