टॉप बातम्या

डोंगरगाववासीयांचे पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

झरी जामणी : तालुक्यातील डोंगरगाव येथे काही नागरिकांनी तलावाच्या जागेवर अतिक्रमण केले असून, पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

सन २००२ मध्ये पारधी समाजबांधवांसाठी वस्तिशाळा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने काही जागा दिली. त्याचा आधार घेऊन काही नागरिकांनी राखीव क्षेत्रात कायदेशिर परवानगी न घेता घरे बांधुन अतिक्रमण केले आहे व समाज मंदिर तसेच इतरत मंदिर सुध्दा सदर जागेवर उभे केले आहे. या गावातील गावकरी व्यक्तीनी पोळा सण भरविण्याकरीता तसेच गुरे ढोरे पाणी पाजण्याकरीता व गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे या जागेत मयत व्यक्तींना जाळण्याकरीता या जागेचा उपयोग समस्त गावकरी करीत होते. परंतु सदर जागेवर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशिर रित्या अतिक्रमण केले असल्यामुळे गावकरी व्यक्तींना अडचण निर्माण होत आहे. काही लोकानी केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात यावे यासाठी ५ जानेवारी रोजी तकार अर्ज दिला होता परंतु गावकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जावर अजुन पर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसून आता समस्त गावकरी व्यक्तींना कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे व गावाच्या विकासाकरीता भुमापन क्रं. १६ वर केलेले अतिक्रमण दूर करणे संदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. कार्यवाही न झाल्याने १५ फेब्रुवारीपासून गावकऱ्यांनी अतिक्रमणा विरोधात उपोषण सुरू केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();