सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
या प्रकरणी वणी पोलिसात खामणकर यांनी तक्रार दाखल केली. तपास शीघ्रगतीने फिरवत पोलिसांनी नांदेपेरा येथील सहा संशयितांना गुरुवारी चौकशी साठी ताब्यात घेतले.
सदरील घटनेबाबत असे की,वर्षा अशोक खामणकर यांची 13 एकर शेती नांदेपेरा शेत शिवारात आहे. या शेतातील वेचलेला 40 क्विंटल कापूस गोठ्यात साठवून ठेवला होता. मात्र, सोमवारी गोठ्यातील कापूस चोरीला गेल्याची माहिती सालगड्याने खामणकरांना दिली. त्यामुळे खामणकर यांनी शेतात जावून पाहणी केली असता गोठ्यातील कापूस चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच कापूस चारचाकी वाहनाने चोरून नेल्याच्या खुणाही घटनास्थळी आढळून आल्या.
याबाबत वर्षा खामणकर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून बंड्यातील कापूस चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भांदवी कलम 461,380, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला व या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुरुवारी याप्रकरणी पोलिसांनी नांदेपेरा येथील सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यात अंकित संजय सोयाम (22) रा. पोहणा, अविनाश दिलीप ठावरी (35) रा नांदेपेरा,अजय रामदास दडांजे (24) रा. पोहणा, अनिकेत सुभाष चिकटे (25) रा.नांदेपेरा, सचिन उद्धव पेंदोर (45) रा नांदेपेरा,अशोक बाबाराव मेश्राम (32) रा.नांदेपेरा असे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आरोपिंचे नाव आहे. या सहा ही आरोपीना आज न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले, न्यायालयाने त्यांना 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सदरची कारवाई डॉ पवन बनसोडे पोलीस जिल्हा अधीक्षक यवतमाळ, व ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पि एस आय आशिष झिमटे, शुभम सोनुले, व प्रफुल यांनी केली.