सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : 13 फेब्रुवारी 2023 सोमवारला सकाळी 11 वाजता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका वं यवतमाळ जिल्हा पूर्वच्या वतीने शासकीय मैदान वणी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दोनही नातू वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा डॉ. भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. जगदीश गवई, मा. एम. डी. सरोदे गुरुजी सचिव मुंबई भारतीय बौद्ध महासभा, मा. रेखाताई ठाकूर प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अशोकभाऊ सोनवणे प्रदेश अध्यक्ष, भारिप, कुशलभाऊ मेश्राम सदस्य पार्लमेन्ट्री बोर्ड वंचित बहुजन आघाडी, प्रा. डॉ. किसन चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडी, रविजी भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ पश्चिम भारतीय बौद्ध महासभा, धर्मपाल माने, मा. रमेश गजभे, माजी राज्यमंत्री, मा. गोविंद दळवी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अध्यक्ष यवतमाळ पूर्व भारतीय बौद्ध महासभा, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, वंचित बहुजन आघाडी, स्वागताध्यक्ष डॉ. निरजभाऊ वाघमारे, बालमुकुंद भिरड, लक्ष्मणराव पाटील, धम्मवतीताई वासनिक इत्यादी मार्गदर्शन करणार आहे. तसेच याच दिवशी मेळाव्यानंतर सांय.6. वाजता युवा गायक वैभव खुने आणि संच उस्मानाबाद यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. तरी समस्त आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते वं बहुजन जनतेनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे, आव्हान भारतीय बौद्ध महासभा वणी च्या वतीने येथिल शासकीय विश्रामगृहात दि. 10 फेब्रुवारी ला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, भगवान इंगळे, किशोर मुन, रमेश चिकाटे (मारेगाव), गोरखनाथ पाटील, संजय जिवने (मारेगाव), डॉ आनंद वेले, विशाल कांबळे, चंपत पाचभाई उपस्थित होते.