Top News

मार्डी येथे राज्यस्तरीय कबड्डीचे सामने : 2 लाख 42 हजाराची भव्य लूट


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
                   
मारेगाव : न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाचे 6 व्या सीजनची जाहीर  घोषणा प्रसिद्धी पत्रकातून नुकतेच करण्यात आली. मौजे मार्डी येथे न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ च्या वतीने 13 फेब्रुवारी पासून भव्य राज्यस्तरीय कबड्डीचे खुले सामने आयोजित केले आहे. या कबड्डी सामन्यात 2 लाख 42 हजाराची बक्षिसे दिली जाणार आहेत. या कबड्डी सामन्याचे उदघाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहेत. 
      
दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2023 या दरम्यान होणाऱ्या तीन दिवशीय कबड्डी सामन्यात 'अ' गटातील पहिले बक्षीस 71000/- रुपये सरपंच रविराज चंदनखेडे यांचेकडून, द्वितीय बक्षीस 51000/- रुपये गौरीशंकर खुराणा यांचेकडून, तृतीय बक्षीस 31000/- रुपये प्रशांतभाऊ मोरे व शेखर जोगी यांचेकडून तर चतुर्थ बक्षीस 11000/- रुपये ज्ञानचंद सुराणा, किर्ती सुराणा, रवी राका यांचेकडून तर 'ब' गटात प्रथम पुरस्कार 31000/- रुपये हबीब खा पठाण यांचेकडून, द्वितीय पुरस्कार 21000/- रु. अरविंद ठाकरे यांचेकडून, तृतीय पुरस्कार 15000/- रु उपसरपंच सुधाकर डाहुले व मोहन जोगी यांचेकडून, चतुर्थ पुरस्कार 11000/- रु. परमानंद जयस्वाल यांचेकडून तसेच वैयक्तिक बक्षिसे सुद्धा दिले जाणार आहेत. या कबड्डी सामन्याची प्रवेश फी अ गटाकरिता 1100/- रु.तर ब गटाची 800/- रु आहेत.

एकूणच 2 लाख 42 हजाराची भव्य लूट असून होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी संघानी मोठ्या संख्येने प्रवेश नोंदवावा असे आवाहन न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने केले आहे.
Previous Post Next Post