सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : कोरोना काळात कलावंतांना कोणतेही काम नसल्याने सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. याकरिता आपल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालय येथे कलावंतांनी अर्ज सादर करायचे आहे. सर्व निकषाचे पालन करून योग्य ती कागदपत्रे अर्जाला जोडून त्वरित वणी तहसील कार्यालय येथे जमा करावे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना काळात आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. अशातच जे कलावंत कलेच्या भरवशावर त्यांचा आर्थिक उत्पन्न होतं तसेच सामूहिक किंवा संस्था विविध कलेच्या माध्यमातून उत्पन्न मिळवायचे अशा कलावंतांना कोरोना काळात उत्पन्न न झाल्याने त्यांचे नुकसान झाले म्हणून शासनाच्या वतीने कोरोना एकल कलाकार व समूह कलाकारांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. करिता वणी तहसील कार्यालयात संपूर्ण करून एकल व समूह कलावंतांनी संपर्क करावा..