टॉप बातम्या

चक्क! घरासमोरील पल्सर दुचाकी चोरट्यांनी लांबवली...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

चंद्रपूर : शहरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून हनुमान खिडकी परिसरातील दादमहल वार्ड येथील आणखी एक दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

शहरात चोरीचं प्रमाण दिवासेंदिवस वाढले असल्याचे दिसून येत आहे. दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पुन्हा एकदा या परिसरामधून पल्सर MH 34 C-7796 या क्रमांकाची लाल व काळा रंग असलेली दुचाकी वाहन सौरव देविदास निलेवार यांचे राहते घरासमोरून दुचाकी चोरट्यानी लांबवली आहे. त्यामुळे परिसरात चोरांची टोळी सक्रिय असल्याची भीती स्थानिकांकडून वर्तविली जात असून काही महिन्यांपूर्वी याच परिसरामधुन सुनिल चिप्पावार यांचे घराचे लाॅक तोडुन घरातील सोनं पळविण्याची घटना सुध्दा घडली होती. त्यामुळे
परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

परिणामी पोलिस प्रशासनाने या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे तसेच या चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व या परिसरामध्ये पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी अॅड. हरीश मंचलवार जिल्हाध्यक्ष भाजपा विधी प्रकोष्ट चंद्रपूर महानगर, यांनी केली आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();