सह्याद्री चौफेर | लखन जाधव
घाटंजी : तालुक्यातील तिवसाळा येथील युवकांनी श्रमदानातून गड्डे बुजवण्याचे काम करून अनोखा उपक्रम राबविला आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष केल्या जात असल्याचे येथील नागरिकांची ओरड असतांना देखील या रस्त्याकडे संबंधित विभागाने पाठफिरवल्याने अखेर गावातील युवकांनी श्रमदानातून गड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
परिणामी या उपक्रमातून गाव पुढाऱ्यांचे तसेच संबधित विभागाच्या ही बाब लक्षात येईल, हीच अपेक्षा
ग्रामहितासाठी आलेले युवक योगेश राठोड, अर्जुन पवार, सूरज टोंगे, अमित जाधव, डॉ बिट्टू,पंकज पवार, करण राठोड, गणेश राठोड, भारत खंडळकर, लखन जाधव, धनराज जाधव, यांनी सह्याद्री चौफेर बोलतांना सांगितले.
