टॉप बातम्या

एस पी एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शारदोत्सव स्नेह संमेलन संपन्न

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : एसपीएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 13 व 14 जानेवारी 2023 ला शारदोत्सव संपन्न झाला. सकाळी नऊ वाजता शारदेची स्थापना करण्यात आली.

लेझीम भजनच्या पथकाने मिरवणूक काढण्यात आली, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व तामगाडगे सर यांच्या हस्ते शारदेची स्थापना करण्यात आली. दुपारी दोन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दिनांक 14 जानेवारीला शालेय अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, बक्षीस वितरणानंतर सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. या स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी मेहनत घेतली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();