सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
शहरातील जत्रा मैदान, पालिकेलगतच्या गल्लीत सुरू असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली असता, गोपाल नामक एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचकडून १ हजार ३४० रुपये व उतारी साहित्य जप्त केले.सदर वरली मटका हा गौतम झाडे नामक इसम चालवत असून आपण त्याच्याकडे नोकर असल्याचे गोपालने पोलिसांना सांगितले. त्यामुळे मटका मालक व गोपाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच दिपक चौपाटी परिसरात खुल्या जागेवर घेत असलेल्या अड्यावरही पोलिसांनी धाड टाकली.
यावेळी विक्की नामक युवकाला ताब्यात घेतले तसेच तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील आठवडी बाजारातही धाड टाकली. येथील मटका घेणाऱ्या किशोर नामक युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुक्यातील अवैध धंद्यावर पोलिसांची कडी नजर असून मटका बहाद्दरांची दाणादाण उडाली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध वणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.