सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. चंद्रकांत लांबट 1988 मध्ये गडचिरोलीत पोलीस हवालदार म्हणून रुजू झाले.
सन 1988 ते 2007 पर्यंत त्यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त भागात एकूण 20 वर्षे सेवा बजावली, त्यानंतर त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली, ऑक्टोबर 2020 रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली, तेव्हापासून ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
त्यांच्या कार्यकाळात दर्जेदार आणि उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले, याआधी त्यांना विशेष सेवा पदक, अंतर्गत सेवा पदक, पोलीस महासंचालक पदक सन्मान आदींनी गौरविण्यात आले आहे.
विशेष उल्लेखनीय की, चंद्रकांत गणपत लांबट हे मारोती गौरकर (ता मारेगाव) यांचे भास जावई असून वनोजा देवी यथील धांडे परिवाराचे जावई आहे.
चंद्रकांत लांबट यांना राष्ट्रपती पदक जाहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
