विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. 
या आजोजित फेस्टिवलचे उदघाटन श्री.नरेंद्र कांडुरवार
गटशिक्षणाधिकारी मारेगाव, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ताटकोंडावर सर, सौ,भाग्यश्री संजय ठावरी, तर 
महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप देरकर, पालक प्रतिनिधी श्री संजय पाटील नक्षणे कार्यक्रमाला उपस्थीत होते.
दोन दिवसीय वार्षिक महोत्सवात क्रीडा खेळ,गायन,नृत्य, स्पर्धा घेण्यात आले व शैक्षणिक सत्र फेबु/मार्च 2022 मध्ये एच.ए.सी प्रथम, द्वितीय, तृतीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कांडुरवार साहेबांनी पुढील भवितव्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. कुळमेथे व प्रा.पोटे यांनी केले तर आभार प्रा. जाधव सर यांनी मानले. प्रा,पुडके, भारत लाडके, देवेंद्र देठे, इत्यादीनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात सहकार्य केले.
विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.