टॉप बातम्या

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी चंदू पाटील मारकवार

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

चंद्रपूर : नवव्या विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड या आदर्श गावाचे २० वर्षांपासून सरपंच राहिलेले व महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानचे सदस्य चंदू पाटील मारकवार यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी डॉ. नाना म्हैसने राहतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती, अकोलाच्या - वतीने व आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षांपासून अकोल्यात विचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा २० व. २१ जानेवारी दरम्यान स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात हे संमेलन होत आहे. हे संमेलन शिस्तबद्ध व चाकोरीबद्ध व्हावे, याकरिता ज्येष्ठ मार्गदर्शकांची समिती, स्वागत समिती, व्यवस्थापन समिती, कार्यवाहक समिती, भोजन समिती, स्वच्छता समिती, सामुदायिक ध्यान-प्रार्थना नियोजन समिती अशा सर्व समित्यांचे गठन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजन समितीचे डॉ. रामेश्वर बरगट, 計 अॅड. संतोष भोरे, गोपाल गाडगे, डॉ. प्रकाश मानकर, प्रा. डॉ. राजीव बोरकर, राजेंद्र झामरे, ज्ञानेश्वर साकरकार, धनंजय मिश्रा, सचिन माहोकार, राष्ट्रधर्म युवा मंच जिल्हाध्यक्ष शेखर साबळे, सचिव प्रतीक दुतोंडे, चतारे गुरूजी आदी 'परिश्रम घेत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();