सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : कोलाम जमातीत सामाजिक अभिसरणाची क्रांती प्रतिबिंबित व्हावी या उदात्त हेतूने मारेगावात आज दि.६ जानेवारी ला कोलाम समाज संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक बदकी भवन येथे होणाऱ्या परिषदेचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती लाभणार होती. संघटनेचे राज्य संघटक लेतूजी जुनघरे हे अध्यक्षस्थानी. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, उपायुक्त डॉ. सचिन मडावी, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी, बिडीओ किशोर गज्जलवार , कोरो इंडियाचे संचालक महेंद्र रोकडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम, इकोनेटच्या संचालक गौरी भोपटकर यांची प्रमुख उपस्थितीत पार पडणार होते परंतु पदवीधर निवडणूकच्या आचारसंहिता लागल्यामुळे सदर आयोजित कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला असून पुढील तारीख लगेचच कळविण्यात येईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
परिषदेत कोलाम जमातीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, स्वातंत्र्य, आदी विषयांकितावर प्रबोधन होणार असून जमातीला मुख्य प्रवाहात येण्यासाठी सकारात्मक संवाद साधून विविधांगी प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहे असेही राहुल आत्राम सांगितले.
जिल्ह्यातील तमाम आदिम जमातीतील बांधवांना सूचित करण्यात येत आहे संवाद परिषदेची पुढील तारीख आचारसंहिता संपल्यावर निश्चित करण्यात येईल व आपणास कळवण्यात असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम यांनी माहिती दिली.