सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा एका युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या जीवनाची यात्रा संपवल्याची घटना आज रात्री 8 वाजता उघडकीस आली.
प्रमोद व्यंकूजी एकरे (43) रा. रामेश्वर असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दोन एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रमोदला यावर्षी अतिवृष्टीने उत्पादनात घट झाल्याने आर्थिक विवंचनेत होता. सकाळी शेतातील तूर कापण्यासाठी गेलेला प्रमोद संध्याकाळ झाल्यानंतरही घरी न परतल्याने त्याचा शोध घेतला असता शेतातील गोठ्यात विष प्राशन करून मृतावस्थेत आढळला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर गावात शोककळा पसरली असून एकरे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्याचे पच्छात आई वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार होता.
सतत होणाऱ्या आत्महत्याने मारेगाव तालुका हादरून गेला असून दिवसेंदिवस आत्महत्या चा विषय गंभीर होत चालला आहे.- नागरिक