सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
या नाटकातील लक्षवेधी भूमिका करणारे जेष्ठ कलावंत अशोकराव सोनटक्के यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले. हे नाटक कौटुंबिक समस्या मांडणारं होत या नाटकातील मध्यवर्ती भुमिका साकारणारे कलावंत हेमंत चौधरी यांनी आपल्या विनोदी शैलीत कौटुंबिक समस्या नवरा बायकोच्या तडजोडीतुन कश्या चुटकीसरशी सोडवता येतात हेच मांडले आणि हेच प्रेक्षकांना खूप आवडले.
सदर नाटकात प्रमुख भूमिका अशोक सोनटक्के, हेमंत चौधरी, उमाकांत म्हसे, प्रा.सिमा सोनटक्के, सौ मिना वानखडे यांनी केल्या, संगीत अजित खंदारे, नेपथ्य वैभव चौधरी, वेशभूषा व रंगमंच व्यवस्था सौ प्रणिता चौधरी व श्रेया चौधरी यांनी पार पाडली.
या यशाचं श्रेय वणीकर रसिकांना आहे असं अंजना उत्तम बहूऊद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा रंगकर्मी प्रा हेमंत चौधरी यांनी व्यक्त केले.