सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : विश्वभुषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याच्या 192 वी जयंती निमित्त वणी येथील धनोजे कुणबी सांस्कृतिक सभागृहात प्रज्वलन 2023 कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी या कलामहोत्सवाच्या उदघाटिका चिखलगाव येथील सरपंच सौ रूपालीताई सुनिलभाऊ कातकडे याच्या हस्ते विश्वभुषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील विनोद पटोले, कोरपना येथील संजय ठावरी वणीचे संजय खाडे, सुरेशभाऊ रायपुरे सौ. संगिताताई खाडे, प्रदीपजी बोनगिरवार, दिलीप भोयर, राजेश पहापळे, अरूणाताई गुरूनुले भांडारकर याची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मान्यवराचे व उल्लेखनीय कार्य क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकाचा सत्कार करण्यात आला. वणीचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वणीचे प्रसिद्ध बिल्डर जमिर खान उर्फ जम्मुभाई, सहकार क्षेत्रातील संजय खाडे, समाजसेवी डॉ महेंद्रजी लोढा, आशा सेविका विविध व मुलींना आत्मरक्षणाचे धडे देणारे फिफ्थ डन ब्लक बेल्ट महाराष्ट्र चिफ शरदजी चिकाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रज्वलन 2023 चा पुरस्कार यवतमाळ येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वसंत कनाके यांना देण्यात आला. रोख एक हजार व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अनिल कनाके, व शंकर घुगरे याच्या शेरोशायरी निवेदनाने सभागृह दणाणले असून रिना आदेची प्रज्वलनावर आधारित कविता रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक केलेचे सादरीकरण करण्यात आले. वणीतील सुप्रसिध्द कुमार आर्केस्ट्रामधील वाद्यवृंद कलावंतानी गीत गायन स्पर्धेतील स्पर्धकांना साथ दिली असून, गीतगायन स्पर्धेतील वणीतील सुप्रसिध्द स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डाॅ. संचिता विजय नगराळे यांनी आपल्या सुमधूर गीताने गीतगायन स्पर्धेला सुरवात केली. या प्रसंगी डाॅ. संचिता विजय नगराळे यांचा व समाजसेवी विजय नगराळे यांचा सत्कार करण्यात आला. व कुमार आर्केस्ट्रामधील सर्व वाद्यवृंद कलावंताचा व परिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात काव्याकुमारी विनोदकुमार आदे या नऊ महीन्याच्या चिमुकलीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची वेषभुषा साकारून या प्रज्वलन 2023 ला रंगत आणल्याने तिच्या परिवाराचा देखील मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. रात्रीला सर्व स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यात पुनवट येथील न्यु इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक अनिलजी ढेंगळे, डाॅ. श्रीकांत भगत, विजयजी शर्मा, नईम शेख, असद सर, स्नेहा पंधरे, वैशाली तेलंग, कर्मा तेलंग, डाबरे सर यानी स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण केले.
रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक अ-गट आकांक्षा देठे तर द्वितीय अ-गट दिव्या पाटील यांना देण्यात आला. ब गटातून प्रथम क्रमांक वैशाली वातीले तर द्वितीय क्रमांक ब गट प्रणाली हिवारकर यांनी पटकाविला.
एकल नृत्य स्पर्धेतील अ- गटातून प्रथम क्रमांक विभुती सवाई अ-गट द्वितीय श्रावणी मुळे, अ-गट तृतीय श्रावणी कडू यांनी तर ब- गटातून प्रथम क्रमांक रिध्दी राऊत, ब-गट द्वितीय मिताली पाडे, ब-गट तृतीय निखिल वाघाडे यांनी पटकाविला.
गीतगायन स्पर्धेतील अ-गटातून प्रथम क्रमांक तनिष्का कळसकर, अ-गटातून द्वितीय क्रमांक विधी निकुळे
तर ब-गटातून प्रथम क्रमांक सुमित ठमके, ब-गटातून द्वितीय क्रमांक रफिक शेख, ब-गटातून तृतीय क्रमांक आचल पवार यांनी पटकाविला.
काव्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक चंद्रमणी दसडो तर द्वितीय श्रीकांत हनुमंते, दत्ता गावंडे, तृतीय रिना आदे व कर्मा तेलंग यांना देण्यात आला.
समुह नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक गुरूकृपा गृपला मिळाला असून द्वितीय क्रमांक जे.डी गृपला तर तृतीय क्रमांक लायन्स ईग्लीश मिडीयम गृपला मिळाला तर, प्रोत्साहन कृष्णागृप व सक्षम ईग्लीश मिडीयम स्कूल ला मिळाला.
प्रत्येक स्पर्धेतील स्पर्धेकानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी नामवंत परीक्षकाचा समावेश होता.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण न्यु गाईज युवा मंचाचे अध्यक्ष विनोदकुमार आदेंनी केले तर एकल नृत्य स्पर्धेचे परीक्षण कशीष पुण्यानी, स्नेहा पंधरे व रिना आदे यांनी केले. गित गायन स्पर्धेचे परीक्षण चंद्रपूर येथील मनिषा घडीवार व मंगेश घडीवार यांनी केले. तर काव्य स्पर्धेचे परीक्षण यवतमाळ येथील सुप्रसिद्ध जेष्ट साहित्यिक प्रा. वसंतरावजी कनाके यांनी केले. समुह नृत्य स्पर्धेचे परीक्षण घुग्गुस येथील वैशाली तेलंग तर यवतमाळ येथील स्नेहा पंधरे यांनी केले. संचालन शंकर घुगरे, आभार प्रदर्शन शैलेश आडपवार यांनी केले.
तर कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी राजु तुराणकर, प्रमोद वासेकर, विजयजी नगराळे, पि आय प्रदीप शिरस्कर, कुणालजी चोरडीया, प्रदीपजी बोनगीरवार, संजयजी ठावरी, गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार, संजयजी खाडे, डाॅ.श्रीकांतजी भगत, अनिलजी ढेंगळे, सि ई ओ अभिजित वायकोस, अरूनाताई गुरूनुले, संजय निमकर, डाॅ.प्रतिक कावडे, डाॅ. अक्षय खंडाळकर, किरणभाऊ दिकुंडवार, अरूणाताई भांडारकर, कविता चटकी, विराज चिकनकर, समिर लाभसेटवार, राजेद्रजी जयस्वाल, शेख नईम, कवडूजी नागपुरे, मारोती मिलमिले, प्रमोद नवले, तुषार अतकरे, सुनिल पाटील, कुमार अमोल कुमरे, योगेश तेजे, निखिल मेहता. तुषार मेहता, यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास बोबडे, सचिन कळसकर, अमन कुल्दीवार, सतीष जुनगरी, शाहरूक शेख, पवन मोहुर्ले, विक्की खानझोडे, आनंद नक्षणे, शंकर घुगरे, विनोदकुमार आदे यानी परिश्रम घेतले.