टॉप बातम्या

केगांव बोदाड रस्त्याची झाली दयनीय अवस्था

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील अनेक खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था वाईट झाली आहे. अशातच मार्डी वरून बोदाड-केगांव कडे जाणारा रस्ता जास्तच खराब झाला आहे. 

तालुक्यातील केगांव रस्ता उखडला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्या उखडल्याने खड्ड्यांचा लांबून त्यांचा अंदाज येत नसून वाहन धारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे रात्रीच्या (Night) वेळी दुचाकी स्वारांची गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केगांव रस्त्याच्या (kegaon Road) दुरावस्थेमुळे या मार्गांवर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे बोलले जात आहे.

गेली दोन वर्षापासून केगांव ते मार्डी चार ते पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता बहुतांश उखडलेला असून, या रस्त्यावर चार चाकी वाहन नाचत चालली असल्याचा भास होतो. त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून या रस्त्याची तंदुरुस्त करण्याची अपेक्षा आहे. 

Previous Post Next Post