सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मारोतराव सांबशिव उर्फ दादासाहेब कन्नमवार यांची १२३ वी जयंती १० जानेवारी मंगळवारला मुन्नुरवार (बेलदार) समाज बांधवानी मुकूटबन येथे साजरी केली. या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
समाजाचे अध्यक्ष बापुराव पुल्लीवार, भुमारेड्डी बाजनलावार, सरपंच, मीना आरमुखार, ग्रा.पं.सदस्य अर्चना चिंतावार, शंकर लाकडे, सुभाष अंगीलवार भुमारेड्डी एनपोतुलवार, संजय आकीनवार, संजय आगुलवार, गजानन पुल्लीवार, भालचंद्र बरशेट्टीवार, विलास चिटलवार, राजेश बोल्लीवार, सुमीत आकीनवार, श्रीनिवास पुल्लीवार, रामलु बाजनलावार, राजन्ना बचलकुरा व इतर समाज मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
यावेळी आमदार साहेबांनी कन्नमवार साहेबांच्या नावाला शोभेल असे भव्य सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन संचालन संजय आगुलवार, प्रास्ताविक विलास चिटलवार तर आभार प्रदर्शन संजय आकीनवार यांनी केले.