टॉप बातम्या

कोळशाची अवैध वाहतूक करणारे ८ ट्रक वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकले

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यात जुगार (Gambling), मटका, कोंबड बाजार यासह आता कोळसाची तस्करी वर पोलिसांनी आपला सिकंजा कसला असल्याचे माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून कोळशाची अवैध वाहतूक होत असल्याचे माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली, त्या आधारे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी आज ११ जानेवारी रोजी या अवैध वाहतुकीचा पर्दाफास करण्यासाठी योजना आखून आपल्या टीम ला वणी, मुकुटबन, रोडवरील पेटूर जवळ रात्री सापळा रचत अवैध वाहतूक करणारे 8 अवजड ट्रक पोलिसांच्या हाती लागले. सतत अवैध मार्ग अवलंबत असल्याने ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी अवैध धंदे (illegal business) करणाऱ्यावर कार्यवाहीचा बडगा उगारल्याने तालुक्यात (wani taluka) अवैध कोळशाची वाहतूक करणाऱ्यांचे मात्र धाबे दनाणले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार मुकुटबन ते वणी या मार्गांवर काही कोळशाची अवैध जड वाहतूक करित असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली. बुधवार दि.11 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा व वणी पोलीस स्टेशन टीम यांनी सापळा रचला आणि वणी मुकुटबन पेटूर जवळ या अवैध जड वाहतूक करणाऱ्या वाहणाची चौकशी सुरू केली असता काही वाहन अवैध वाहतूक करित असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. यात एम एच ४० बिजी २६५८, एम एच ३४ बिझेड २५२८, एम एच ३१ सीक्यू ४७५२, एम एच ३४ बिझेड २५२९, एम एच ४० बिजी ०२६०, एम एच २९ बि ई ४०८९, एम एच ३४ बिजी २४७८, एम एच ३१ सिक्यू ७४६६ या क्रमांकाच्या वाहणाचा समावेश आहे. या वाहनधारकांकडे कोणतेही कोळशा संबंधित वैध कागदपत्रे नसल्याने सदर वाहन डिटेन करून पोप्रस कलम ४१ (१) (ड) प्रमाणे कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान, वाहनामध्ये अंदाजे २०,८०,०००/- रुपयाचा कोळसा व वाहणाची अंदाजे किंमत २,२१,००,०००/-असा एकूण २,४१,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई डॉ पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा संजय पूज्जलवार उपविपोअ वणी, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, पोनि प्रदीप परदेशी स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, अमोल मुडे, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदूरकर, सतीश फुके, हरिन्द्र भारती, वसीम शेख, सुरेश किनाके यांनी केली. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();