टॉप बातम्या

ओबिसींनी आता जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी रेटून धरण्याची गरज निर्माण झाली आहे - प्रा हरी नरके

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : थोर स्वातंत्र्यसेनानी महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते, लेखक प्रा.हरि नरके यांचे राष्ट्रहितासाठी ओबिसी, (VJ/NT/SBC) ची स्वतंत्र जातिनिहाय जनगणना करणे काळाची गरज या विषयावर १० जानेवारी रोजी वणी येथे जाहीर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या जयंती औचित्याने ओबीसी हे निर्माण करते लोक आहेत, ओबिसी, भटके म्हणजे निर्माण करणारा समाज आहे, ओबिसी ही जात नाही तो वर्ग आहे. आम्ही वर्गाचे हक्क मागतो आहो. आमचा वाटा आंम्हाला द्या, त्यामुळे आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळेल, वसतिगृहात प्रवेश मिळेल, परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, जगातला आनंदी देश भुतान आहे. तीथे शिक्षण, आरोग्य मोफत आहे. शिक्षणासाठी व दवाखाण्यासाठी एकही रूपया खर्च होत नाही. म्हणुन भुतान हा आनंदी देश आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण मोफत देण्याची मागणी केली होती.
ओबिसीची एकुण संख्या जाहीर केली जात नसल्याने हा समाज शासनाकडून मिळणाऱ्या सोई, सुविधा, व सवलती पासून वंचित राहत आहे. ओबिसीची आकडेवारी निश्चित न झाल्याने या प्रवर्गाचा विकास खुंटला आहे. ओबिसी आपल्या हक्कासाठी जागृत नसल्याने त्यांची बोळवण करून जातीनिहाय जनगणना न करता त्यांच्या प्रगतीत बाधा आणली जात आहे. २०१० चा ट्रिपल इम्पिरिकल डाटा असतांनाही तो दिला जात नसल्याने ओबिसीच्या लोकसंख्येची घोंगडी भिजत पडली आहे.
एसी, एसटी यांची जणगणना करण्यात आली. पण ओबिसीची जनगणना करण्यात येत नाही. ओबिसींना २७ टक्के आरक्षण मिळाल्यास ओबिसीचे विधानसभा, लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रतिनिधी व मंत्री राहतील, परंतु ओबिसीची जातीनिहाय जनगणना केली जात नसल्याने त्यांना आरक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे. ओबिसींनी आता जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी रेटून धरण्याची गरज निर्माण झाली आहे. असे ते या प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, ओबिसी जातीनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, डॉ, शिरीष कूमरवार, राजाभाऊ बिलोरीया, मोरेश्वर उज्वलकर, राजू जयस्वाल यासह विविध समाजाचे अध्यक्ष व अनेक मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();