टॉप बातम्या

कपाशीवर लाल्या रोगा पाठोपाठ रेडबग किडीचा प्रकोप


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील खरीप हंगामातअतिवृष्टीमुळे पिकाची अवस्था बिकट झाली होती. सोयाबीन कपाशी पिके रोगांनी ग्रासले. वाढ पुरेशी झाली नाही. कशीबशी पिकांची वाढ झाली तर कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमक झाले परिणामी उत्पादनात कमी झाले. आता ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी कपाशीवर पुन्हा खर्च करून उत्पादन निघेल अशी आशा केली तर रेडबग या रोगाने आक्रमण केले आहे. रेडबग इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की मजूरांना कापूस वेचणी करताना त्रास होत आहे. कापूस वेचणी करताना अडथळा निर्माण झाला आहे. दारव्हा तालुक्यात अनेक ठिकाणी रेडबग किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
यावर्षी पाऊस जास्त झाल्याने कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावरनुकसान झाले. पावसाळा संपला आणि हिरव्यागार कपाशीच्या झाडावर लाल्या रोगाचे प्रमाण वाढले. आता काही ठिकाणी रेडबग अर्थात लाल ढेकूण या किडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आता कपाशीला असलेल्या बोंडात ही किड दिसून येत आहे. तसेही आता कपाशी उलगंवाडाला आली आहे.. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी असे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. एकापाठोपाठ एक अशा किडींचा प्रकोपाने कपाशी उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

शेवटच्या टप्प्यात रेडबग किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेवटच्या बोंडातील सरकी ही कमी वजनाची होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. रेडबग किडीचा प्रादुर्भाव मागील चार- पाच वर्षापासून होत आहे. किडीच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. त्यामुळे किटकनाशकांचा खर्च करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. या किडीच्या प्रादुर्भावाने कापसाची प्रत घसरते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();