टॉप बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; आर एस बार जवळील घटना


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गुरुवार रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली किशोर विजय रोहनकर २१ वर्ष असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो मोखाळा येथील रहिवाशी आहे.
मृतक हा ट्राक्टर चालक असल्याने याच रोजगारावर कुटुबाचा प्रपंच चालवित होता, घटनेच्या दिवशी मृतक आपल्या गावावरुन कवठी येथे मामाकडे कामानिमित्य आपल्या दुचाकीने आला होता काम करुण परत आपल्या गावाकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग चन्द्रपुर-गडचिरोली मार्गालगत सावली आर एस बार जवळ वाहनाने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचले मृतकाचे पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृतकाच्या पश्चात आई वडील, बहिण असा आप्तपरिवर असून किशोर च्या निधनाने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे,पुढील तपास सुरु आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();