टॉप बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मारेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते पदनियुक्त देऊन मारेगाव तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये सुरज नागोसे (तालुका उपाध्यक्ष, मारेगाव), कुणाल शेडामे (बोटोणी विभाग अध्यक्ष), तुषार नेहारे (बोटोणी विभाग उपाध्यक्ष), आकाश नेहारे (बोटोणी विभाग सचिव), सतीश पारखी (वेगांव विभाग अध्यक्ष), सुहास वासाडे (वेगांव विभाग उपाध्यक्ष), वसंता घोटेकर (कुंभा विभागीय अध्यक्ष), व गणेश क्षीरसागर (कुंभा विभाग उपाध्यक्ष), यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचेवर जबाबदारी सोपवली असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे यांनी दिली आहे. 

वणी पक्ष कार्यालय येथे पार पडलेल्या नियुक्ती सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मनविसे चे चांद बहादे, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शिवराज पेचे, यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();