टॉप बातम्या

एवढी हिम्मत! शेतकऱ्याचा 12 क्विंटल कापूस चोरीला


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सद्यस्थितीत कापूस हंगाम असतांना तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ माजविला आहे. बाजारात यंदा कापसाला बऱ्या पैकी भाव मिळत असल्याने चोरट्यांची नजर आता शेतकऱ्यांच्या शेतांवर गेली आहे. तालुक्यात चोपण, पिसगांव परिसरात कापूस चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चोपण येथील शेतकऱ्याच्या शेतातील उभारलेल्या बंड्यातून बारा क्विंटल कापूस चोरी गेला असून, याबाबत पोलिसात तक्रारसुद्धा केली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील पाइप, कृषिपंप, ठिबक-स्प्रिंकलरचे साहित्य चोरीला जात होते. पण चोरटे आता त्याही पुढे निघाले असून, थेट पिकावरच हात साफ करीत आहेत. खरिपात कपाशीची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. यंदाच्या अतिवृष्टी ने कपाशीचा उतारा कमी आहे. बाजारात दर चांगले असल्याने चोरटे कापूस चोरीच्या मार्गावर लागले आहेत. अशातच दि.१२ जानेवारी च्या मध्यरात्री चोपण येथील शेतात असलेल्या बंड्यातून तब्बल १२ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटका बसला असून चिंतेचे सावट पसरले आहे. पांडुरंग सुधाकर तुरंगे यांच्या शेतात शेती उपयोगी वस्तू, पिक ठेवण्यासाठी बंडा उभारला. याच बंड्यातून १२ क्विंटल कापूस कुलूपबंद असतांना अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारच्या रात्री थेट चारचाकी वाहनातून किमान एक लाख रुपये किमतीचा कापूस लांबविल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने या परिसरात विविधांगी चर्चेला उधाण आले असून "एवढी हिम्मत! शेतकऱ्याचा बारा क्विंटल कापूस चोरून नेला, असे बोलल्या जात आहे. या कापूस चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यात कमालीची दहशत आणि चिंता पसरली असतांना हे चोरटे पकडण्यास पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून पोलिसांना चोर सापडणार कां? अशी चर्चा रंगत आहे.

चोरटा शिवारातून पसार
    
तालुक्यातील पिसगाव येथील किशोर बेलेकार यांच्या शेतातील उभ्या कपाशीच्या झाडाचा कापूस वेचणी करीत चोरून नेण्याच्या प्रयत्नात शेतमालक शेतात येताच कापूस चोर पळून जाण्यास यशस्वी ठरला. दरम्यान जवळपास ५० किलो कापूस प्लास्टिक पिशवी सोडून या चोरट्याने पोबारा केला. सदर घटनेची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();