मासेमारी संस्था व समाजबांधवांच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर निर्णय घेणार- पालकमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : राज्याचे वने, मत्स्यपालन व सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी संस्था व समाजबांघवांच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष देत त्यात जलदगतीने निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा नागभीड तालुका ढिवर-भोई समाज सेवा संघ व नागभीड तालुका मासेमारी संस्था यांच्यावतीने ब्रम्हपुरी येथील विश्रामगृहात शाल श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
            
मागील युती सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी संस्थांच्या बळकटी साठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. तसेच चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचे मासेमारी करण्यायोग्य साहित्य अनेक मासेमारी संस्थांना प्राप्त झाले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मत्स्यव्यवसाय मंत्री पद हातात येताच मत्स्यव्यवसायासाठी जलाशय ठेक्याने देण्यासाठी धोरणात महत्वपूर्ण बदल करत स्थानिक मासेमारी संस्थांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे हा निर्णय घेतल्याने अनेक मासेमारी संस्थांना या निर्णयाचा फायदा झाला व संस्थेच्या सभासदांना रोजगार प्राप्त झाला. 
             
आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या भोई व ढीवर समाजाच्या प्रगतीचा विचार करणारा सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखा दुरदृष्टीचा लोकनेता मत्स्यव्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतल्याने समाजबांधवांमध्ये विकासाप्रती आशेचा किरण निर्माण झाला आहे. समाजबांधव व संस्थेच्या अनेक समस्यांसदर्भात लवकरच शासनस्तरीय बैठकीचे आयोजन करणार असल्याचे नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. 
         
यासाठी कृतज्ञता म्हणून गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते , माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा मच्छीमार सेलचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेते डॉ.दिलीप शिवरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नागभीड तालुका ढिवर-भोई समाज सेवा संघ अध्यक्ष गुलाबरावजी भानारकर, पदाधिकारी नागोराव नान्हे, नागोजी भानारकर,चांदेकर सर,विजयजी नान्हे, स्वप्नील अलगदेवे यांच्या हस्ते नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. यावेळी मिंडाळा, नागभीड, नवरगाव, नवखळा, कोसंबी गवळी,पारडी, बाळापूर, वासाला मेंढा या मासेमारी संस्थांचे अध्यक्ष व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
         
मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या ढिवर-भोई बांधवांच्या तसेच मासेमारी संस्थांच्या समस्यांचे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना मुनगंटीवार यांनी मासेमारी संस्था व समाजबांधवांच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर निर्णय घेणार असल्याचे सांगत लवकरच यासंदर्भातील शासन निर्णय होणार असल्याचे सुतोवाच केले.
मासेमारी संस्था व समाजबांधवांच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर निर्णय घेणार- पालकमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार मासेमारी संस्था व समाजबांधवांच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर निर्णय घेणार- पालकमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.