सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी-जामणी : प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील होय. प्रत्येक खेडेगावामध्ये पोलीस पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस पाटलाच्या मदतीने गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करण्यात येत असते. त्याचप्रमाणे पोलीस पाटील हे गावातील तंटामुक्तीचे कार्य करत असतात.
मात्र, या पोलीस पाटलांची आजवर समस्या जैसे थे असल्याने आज 22 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे गाव कामगार पोलिस पाटील संघ संघटना द्वारा विधानसभेवर भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खालील प्रमाणे मागण्याकरण्यात आल्या आहे.
1) पोलिस पाटील यांचे मानधन 18 हजार रुपये करण्यात यावे. 2) पोलिस पाटील यांचे नूतनीकरण कायम बंद करण्यात यावे 3) पोलिस पाटील यांचे निवृत्ती वय 65 वर्ष. करण्यात यावे. या महामोर्चाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पोलिस पाटील यांनी हजेरी लावली व शासनाचे लक्ष वेधले.
या मोर्चात पोलिस पाटील संघटना पाटण ता.झरी (जा) जि.यवतमाळ येथील संघटनेचे सचिव विनोद पेरकावार यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गेडाम, प्रकाश मेश्राम. कुमरे पाटील, मडावी पाटील, उरवते पाटील, पेंदोर पाटील, गहरवार पाटील, कोडापे पाटील, आत्राम पाटील, दिनेश सिडाम पाटील व ईतर पोलिस पाटील यांनी नागपूर येथील पोलिस पाटीलांच्या विविध मागण्या घेऊन महामोर्चा मध्ये सहभागी झाले होते.
पोलीस पाटलांचा महामोर्चा धडकला विधानसभेवर..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 22, 2022
Rating:
