नवरत्न स्पर्धेत नवेगाव भुज शाळेचे सुयश .....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्याच्यात आत्मविश्वास जागवण्यासाठी जि. प चंद्रपूर च्या वतीने दरवर्षी जि. परिषद शाळामध्ये वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते ८ या वर्गातील विदयार्थ्यांसाठी केंद्र,तालुका व जिल्हा स्थरावर नवरत्न स्पर्धेचे आयोजन शिक्षण विभागाकडून केल्या जाते.
     
या वर्षी जुनासुर्ला केंद्र प.स.मूल च्या नवरत्न स्पर्धेचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कूल जि. प.शाळा जुनासुर्ला याठिकाणी करण्यात आले होते.या स्पर्धेत जि.प.उच्च प्राथमिक शाळा नवेगाव भुज च्या सहभागी विद्यार्थिनी/ विद्यार्थी नी घवघवीत यश मिळवले.
त्यामध्ये माध्यमिक विभागातून वादविवाद स्पर्ध्येत कु.नम्रता दिगंबर भाकरे,कथाकथन स्पर्धेत कु.प्रतीक्षा संजय घोगरे
सूंदर हस्ताक्षर स्पर्धेत कु छकुळी बंडू भिवनकर यांचा अनुक्रमे पहिला तर माध्यमिक विभागातूनच एकपात्री भूमिकेत कु नम्रता दिगंबर भाकरे,समरणशक्ती स्पर्ध्येत कु हेमश्री नरेंद्र चुदरी, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत कु प्रतिक्षा संजय घोगरे या विद्यार्थिनीचा अनुक्रमे दुसरा क्रमांक आलेला आहे.
 
प्राथमिक विभागातून समरणशक्ती स्पर्ध्येत कु.वैष्णवी मुर्लीधर चावरे हिचा दुसरा क्रमांक आलेला आहे
    सहभागी व विजयी स्पर्धकांना वही व पेन देऊन मा गजेंद्र कोपुलवार केंद्रप्रमुख यांनी गौरव केला.
  शाळेतील ह्या यशाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री, कैलास वाकडे,सौ अनिता आईचंवार,कु, किरण मानकर, श्री जगदीप दुधे,श्री बालस्वामी कुमरे,श्री उमाकांत दोडके,श्री आकाश कुकुडकर या मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन केले .....
नवरत्न स्पर्धेत नवेगाव भुज शाळेचे सुयश ..... नवरत्न स्पर्धेत नवेगाव भुज शाळेचे सुयश ..... Reviewed by सह्याद्री चौफेर on December 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.