सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : वणी-यवतमाळ महामार्गावर मांगरूळ जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला. या दुर्घटनेत मामा गंभीर जखमी झाले असून भाषाला किरकोळ दुखापत झाली असून ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास घडली.
मारेगाव येथून आपली कामं आटोपून मांगरूळ गावावरून वेगाव कडे जाणाऱ्या दुचाकी अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शेखर गोघाटे (४०) रा. वनोजा तालुका वरोरा हा गंभीर जंखमी झाला तर, प्रकाश रमेश ढवस (२४) रा.वांजरी ता.वणी हा किरकोळ जखमी आहे.
अपघातग्रस्त हे बहिणीला भेटण्यासाठी मारेगावरून आपल्या दुचाकीने वेगावकडे दोघेही निघाले होते. अशातच मांगरूळपासून वेगाव कडे "टर्न" घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामा व भासा हे दोघेही जखमी झाले असून, जखमीना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ शेखर गोघाटे यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2022
Rating:
