सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : बहुचर्चेत असलेल्या ग्रामपंचायत २०२२ निवडणूकीचा पंचरंगी कार्यक्रम आता चांगलाच रंगताना दिसत असून सर्वच जण आपापल्या परीने कामाला लागले आहे. तालुक्यातील वेगांव, कोसारा, मार्डी, हिवरी, वनोजा, नवरगाव, कानडा, शिवणी, गौराळा, या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. तूर्तास या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवारांना चांगलाच जोर लागणार किंबहुना जोर लावावा लागणार आहे. खरंतर दरवर्षी होणारी ही प्रक्रिया नसून दर पाच वर्षाने येणारा प्रोग्राम असल्यामुळे आता मतदार सावध झाले आहे. आणि व्हावे लागेल, नाहीतर पुन्हा पाच वर्ष बोंबलत बसाव लागणार यात शंका नाही. आजतागायात ग्रामपंचायतची परिस्थिती काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कर्त्या ला कधीच कोणाची साथ नसते आणि मिळत सुद्धा नाही. म्हणून "लायकी" नसलेल्यांच्या हातात सत्ता द्यायची हा आजवर चा ग्रामपंचायत इतिहास, बहुतांश अनुभव आहे. हा मात्र, योग्य माणसाच्या हाती गावाची धुरा दिली तर खूप काही होऊ शकतं. त्यासाठी कोणी पुढाकार घेतांना दिसत नाही. परंतु आता गांव पुढऱ्यांनी बदलायला हवं,पक्ष गट तट सोडून आधुनिक युगाची कास धरावी, आणि त्यापलीकडे जावून जर विचार केला मि म्हणेन हे सध्या चं युग अँड्रॉइड युग आहे. इथे डोक्याचा खेळ नसून बोटांचा खेळ सुरु झाला आहे. आता डोकं काम करत नसून बोटे कामं करू लागली. त्यासाठी गावाच्या विकासाभिमुख कामे, समस्या जलदगतीने पूर्ण करण्यासाठी स्थानिकांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहेत. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक आणि चांगला उमेदवार "भाऊ" हा महत्त्वाचा विषय आहे. या दृष्टिकोनातून निवडणुकीकडे मतदारांनी फार वेगवेगळ्या बाजूने बघणं गरजेचे आहे. तालुक्याच्या आणि गावाच्या विकासात संजीवनी ठरणाऱ्या या होऊ घातलेल्या "ग्रामपंचायत" निवडणुकीचा वेध सर्वांनी घ्यावा...
गावाचा विकास साधायचा असल्यास प्रथम पायाभूत सुविधा, दर्जेदार रस्ते, कुशल ग्रामपंचायत बॉडी, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि गावातील एकजूटचे पोषक वातावरण असणे अतिमहत्त्वाचे असते. मात्र, यात अनेक गांव नेहमीच पिछाडीवर राहिली आहे. परंतु त्यासाठी चांगला माणूस ग्रामपंचायत लाभला तर तो वेळोवेळी जनहिताची पाऊले उचलून गांव समृद्ध झाल्या बिगर राहणार नाही. मारेगाव तालुक्यातील ९ गावांची निवडणूक येत्या १८ डिसेंबर ला पार पडत आहेत. या नऊ गावांना विकास साधायचा असेल तर तरुणांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत. जर प्रत्येक तरुणांनी ठरवलं किंबहुना "आमचं ठरलं" असं जरी म्हटलं तर गावचा कायापालट नक्कीच होईल. गावातील लाईट, नाल्या, पाणी, आरोग्य, शिक्षण, इतर समस्या सहजपणे सोडवता येईल, विशेष म्हणजे...तरुणांना लागलेले व्यसन, भांडण तंटे हे आपसूकच मिटतील...
कुशल उमेदवारीतून गावाची विकास भरारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2022
Rating:
