माजी मंत्री व आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज शालेय धोरणाला अनुसरून सावली तालुक्यातील संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांची घेतली बैठक
सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : सावली तालुक्यात सद्या वाघाच्या हळ्यात निर्दोष व्यक्तींचा जीव गेला.सर्वत्र हाहाकार उडाला.जन सामान्याचे जीवन विस्कळीत आले.सकाळ आणी संद्याकाळी वाघाच्या भीतीमुळे दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले.विदयार्थी,शेतकरी बेहाल झाले.जंगल व ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण झाले. विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणातिल नुस्कान होत असल्याचे निर्दशनास येताच अतिदक्षता असलेल्या सावली तालुक्यातील ४० गावातील व सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे पुढे सरसावले आहेत. सावली तालुक्यातील संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख,शिक्षक यांची पंचायत समिती सावली येथे बैठक घेतली.मा.सुनीता मरस्कोल्हे, सवंर्ग विकास अधिकारी सावली, मा.लोकेश खंडारे, शिक्षणाधिकारी,मा.श्रीरंग कुंभरे, विस्तार अधिकारी यांच्या समवेत सावली तालुक्यातील खाजगी, प्राथमिक व सरकारी शाळेतील विविध केंद्रप्रमुख,मुख्याधापक व शिक्षकांन सोबत बैठक घेतली त्यात. विध्यार्थी व शाळेतील संबंधित अनियमित बससेवा, शाळा सुधार समिती, शाळेसाठी वाल्कम्पोंड, बोरवेल, किचनशेड व पाठयपुस्तके या विषयांवर चर्चा करण्यात आली.मा.विजय वडेट्टीवार यांनी समस्या ऐकत त्यांना लवकरात लवकर परिपूर्णतः सोयीस्कर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.या वेळी श्री.संदीप गड्डमवार,माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर,मा.संतोषसिंग रावत , मा.नंदू नागरकर,
श्री.विजय कोरेवार,माजी सभापती प.स.सावली.मा.विजय मुत्यालवार शहराध्यक्ष काँग्रेस सावली व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याधापक,शिक्षक व नगरसेवक,कमलेश गेडाम, तालुकाध्यक्ष सोशल मीडिया विभाग सावली या वेळी उपस्थित होते.
माजी मंत्री व आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज शालेय धोरणाला अनुसरून सावली तालुक्यातील संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांची घेतली बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 25, 2022
Rating:
