बाळासाहेबांची शिवसेनेच्या मारेगाव तालुका प्रमुख पदी विशाल किन्हेकार तर शहर प्रमुख पदी विजय मेश्राम यांची नियुक्ती


सह्याद्री चौफेर | रवी घुमे

मारेगाव : वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दि. ९ डिसेंबर ला यवतमाळ येथे कार्यक्रम आयोजित केला. यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मारेगाव तालुका प्रमुख पदी विशाल मनोहर किन्हेकार तर मारेगाव शहर प्रमुख पदी विजय उंदरुजी मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढी साठी आपण सर्वांना सोबत घेवून कार्य कराल असा विश्वास असल्याचा पक्षाच्या वतीने व्यक्त केला आहे.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख व शहर प्रमुखांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बाळासाहेबांची शिवसेनेच्या मारेगाव तालुका प्रमुख पदी विशाल किन्हेकार तर शहर प्रमुख पदी विजय मेश्राम यांची नियुक्ती बाळासाहेबांची शिवसेनेच्या मारेगाव तालुका प्रमुख पदी विशाल किन्हेकार तर शहर प्रमुख पदी विजय मेश्राम यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on December 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.