टॉप बातम्या

वणी ठाण्याला तात्पुरता मिळाला ठाणेदार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वणी पोलीस स्टेशन ला मिळाले नवे ठाणेदार. शहरात चोरी, अवैध धंदे तसेच पत्रकारांवर प्राणघातक हल्ला या घटनेमुळे पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या. अशातच रामकृष्ण महल्ले यांची उचलबांगडी झाली होती. दीड महिना लोटत असतांना आज वणीला ठाण्याला तात्पुरता ठाणेदार मिळाला.

प्रदीप शिरस्कर यांनी आज दुपारी ४ वाजता प्रभार घेतला. गेल्या महिन्याभऱ्यापासून वणी ठाण्याचे ठाणेदाराशिवाय कामकाज सुरु होते. यवतमाळ जिल्ह्यात वणी हे महत्वाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. शहराच्या अवती भवती आर्थिक स्रोत विविध स्वरूपाने बघायला मिळतात. शिवाय येथील प्रशासकीय पद मिळवणं अतिशय महत्वाचे मानल्या जाते, त्यामुळे वणी ठाण्याला दमदार अधिकारी मिळावा अशी मागणी असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोडे यांनी वणी पोलीस स्टेशन ला प्रदीप शिरस्कर यांना तात्पुरता कार्यभार दिला आहे.

शिरस्कर यांनी एल सी बी यात प्रमुख म्हणून कार्य केले आहे. आता वणीतील दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरी सह विविध समस्या पेलण्याचे आवाहन त्यांचेवर उभे ठाकले आहे.
Previous Post Next Post