लोकस्वातंत्र्यच्या किशोर मुटे यांना वर्ल्ड पार्लमेन्ट इंटरनॅशनल अवार्ड


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

हिंगणघाट : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे हिंगणघाट येथील पदाधिकारी, विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्कप्रमुख,पत्रकार किशोर मुटे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीरामपूर येथे झालेल्या पुरस्कार वितरणाच्या शानदार कार्यक्रमांमध्ये वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अॕन्ड पार्लमेंट असोसिएशनकडून घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हा अवार्ड देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटूंबियांचींही उपस्थिती होती.
      
किशोर मुटे हे पोलिस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेनेचे विदर्भ अध्यक्ष व वर्ल्ड पार्लमेंट चेही पदाधिकारी असून ते चळवळीत काम करणारे नेते आणि अ.भा.ग्राहक परिषदेचे वर्धा जिल्हा संघटक आहेत. दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक,आध्यात्मिक क्षेत्रातील वाटचाल तथा शेतकरी,श्रमिकांना न्याय देण्याचे कार्य व ग्राहक चळवळीतील अनेक वर्षांच्या योगदानाचे उचित मुल्यमापन म्हणजे मुटे यांना प्राप्त होणारे अनेक सन्मान आहेत.वर्ल्ड पार्लमेन्ट कॉन्स्टीट्यूशन अॕन्ड पार्लमेंट असोसिएशनकडून त्यांना प्राप्त पुरस्कार सुध्दा ते एक अल्पभुधारक शेतकरी असून प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने करीत असलेल्या नि:स्वार्थ समाजसेवेची त्यांना मिळालेली एक पावती आहे.
डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.दत्ता विचारते यांनी मुटेंसह महाराष्ट्रातील अनेक नामवंतांच्या नावाची या पुरस्कारासाठी घोषणा केली होती.त्यात मुटे यांनाही श्रीरामपूर येथील कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी डब्ल्यूसीपीएचे ईतर सन्मानित पदाधिकारी व बहूसंख्य पुरस्कारार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post