सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : बुध्दाविहार समिती देवाळा तर्फे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ. आंबेडकरांच्या तैल चित्राचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामूहिक त्रिसरण-पंचशीला घेऊन समारोपीय सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी गजानन बुरडकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लहुजी जीवतोडे होते.
महामानव डॉ. आंबेडकर व समाजकार्य या विषयावर सविस्तर व मुद्देसूद मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विहार समितीचे अध्यक्ष आयु. रमेशजी भगत यांनी केले.
कार्यक्रमासाठी बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीटीसाठी शीतल महेश कर्मनकर, अरुण गांजरे, निर्मला अवताडे, रुखमा डंभारे, राहुल हस्ते, स्वप्नील भगत, चिंटू फुसाटे व सर्व नागरिकांनी तन्मनाने परिश्रम घेतले.