सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
नागभिड : नागभिड वनपरिक्षेत्रातील चिंधिचक शेतशिवारालगत जंगलं परिसरात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असुन ही घटना आज उजेडात आल्याने परिसरात खडबड उडाली आहे.
घोडाझरी जंगलं परिसराला लागुन असलेल्या चिधिंचक येथिल भास्कर आठमांडे यांचे शेत आहे. त्याला लागुनच जंगलं परिसर असुन, मागचे बाजुने इतर वन्यप्राण्याने खाल्लेला पट्टेदार वाघ गावकऱ्याच्य लक्षात आल्याने घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता नागभिड वनविभागाचे कर्मचारी घटनेस्थळी दाखल झाले असुन प्रथम दर्शनी सदर वाघाला जंगली रानकुत्र्यांनी हल्ला करून मारले असावे असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
घटनास्थळी वाघाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून वनविभागाचे कर्मचारी घटनेचा अधिक तपास करीत आहे.