टॉप बातम्या

वेगवेगळ्या तिन अत्याचाराच्या घटनेतील तिघांना अटक


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 
9623494935

सावली : तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर (वय १९) या आरोपीने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. मात्र, लग्नास नकार दिल्याने पालकाच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

तर, सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या (वय २५) युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();