आता तातडीने लक्ष द्या - अन्यथा....मनसेने वीज वितरणला दिले "स्मरणपत्र"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
7218187198

मारेगाव : रब्बी हंगाम सुरु आहे. शेतात कपाशी, यासह विविध पिक असून सध्या शेतकऱ्यांना ओलिताची आवश्यकता आहे असे असतांना वीज वितरण कडून विजेचा सतत लपंडाव सुरु आहे. या आधीही १५ जून ला या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याकडून विद्युत लपंडाव सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचं काम मा उपविभागीय अभियंता, मारेगाव यांनी थांबवावं यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात आज दि.१५ नोव्हेंबर रोजी स्मरणपत्र देण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील कुंभा, मार्डी वेगाव, बोटोणी परिसरातील गावठाण व एजी (AG) लाईन वारंवार जात असून सध्या रब्बी पिकास पाणी देणं आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठ्या ची गरज भासत आहे. मात्र अशा महत्वाचे वेळातच "बत्ती गुल मिटर चालू" असे आपल्या विभागाकडून होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचं काम वारंवार होत आहे.
ज्या विभागात आपल्या मार्फत लाईन दिली जात आहे त्या विभागात शेतकऱ्यांना ओलीत करण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. या सर्व मागण्या संदर्भात मागील काही दिवसापूर्वी आपणास निवेदन देण्यात आले होते परंतु या गंभीर बाबीवर कुठल्याही प्रकारचा अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था पाहता पुन्हा आपणास एकदा आग्रहाची विनंती आहे की, शेतकऱ्यांना ओलिताकरिता एजी (AG) लाईन दिवसाची शेतकऱ्यांना 12 तास ठेवण्यात यावे, व यासंदर्भात असे वेळापत्रक जाहीर करून शेतकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावे. वरील समस्या शेतकऱ्यांकरिता अतिशय गांभीर्याच्या असून आपण याकडे तातडीने लक्ष घालून या समस्या येत्या सात दिवसात सोडवाव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल असा सज्जड ईशारा देण्यात आला.
यावेळी संतोष रोगे जिल्हा उपाध्यक्ष,शंकरभाऊ वरघट जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत जोगी, वसंता घोटेकार, नबी शेख, लाभेश खाडे, चांद बहादे, गणेश खुसपुरे, प्रवीण नान्हे,सुरेश लांडे,आशिष खंडाळकर, अंकुश वैद्य, आकाश खामणकर, या सह असंख्य मनसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
आता तातडीने लक्ष द्या - अन्यथा....मनसेने वीज वितरणला दिले "स्मरणपत्र" आता तातडीने लक्ष द्या - अन्यथा....मनसेने वीज वितरणला दिले "स्मरणपत्र" Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.