सह्याद्री चौफेर | रवि घुमे
9637202778
मारेगाव : मा. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात सुरु असलेली 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात दाखल झाली. या भारत जोडो समर्थनार्थ वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी गुरु आनंद पेट्रोल पंप येथून बाईक रॅली काढण्यात आली.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु आहे. या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरु आहे. या यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी मारेगावात काँग्रेस च्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. येथील हायवेवरील पेट्रोल पंप येथून रॅली ला प्रारंभ झाला, मारेगाव यवतमाळ मार्गाने मार्गक्रमण करित रॅलीचा शहरातील मुख्य मार्ग प्रवास करून समारोप करण्यात आला.
या बाईक रॅलीत मारोती गौरकार, रवींद्र धानोरकर, अंकुश माफूर, सय्यद समिर, धनंजय आसुटकर, यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मारेगावात बाईक रॅली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 15, 2022
Rating:
