माथार्जून येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 
9922771734

झरी : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि युनीसेफ इंडिया, पुणे द्वारा संचालीत महाराष्ट्रातील आदिम जमाती बहुल क्षेत्रात 3 सूक्ष्म प्रकल्प/केंद्र उभारणे या योजनेची अंमलबजावणी सुरु असुन आज दिनांक 15 नोव्हेंबर 20 22 रोजी झरी तालुक्यातील माथार्जुन येथील आई मंदीर येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस व पेसा व वनहक्क जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर जनजागरण मेळाव्याला झरी-जामणी तालुक्यातील ज्या गावांना CFR मिळाला तसेच ज्यांना IFR मिळाला अशा गावातील लोकांना आणि वनहक्क समितीच्या सदस्यांना पेसा आणि वनहक्क अधिनियमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस आदिम जमाती सूक्ष्म केंद्रातील तसेच पेसा व वनहक्क संसाधन केंद्राचे कर्मचारी, त्याचप्रमाणे ग्रामसाथी, क्षेत्र समन्वयक आणि प्रकल्प समन्वयक उपस्थित होते.

जनजागरण मेळाव्याला कोलाम जमातील लोकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती दर्शवून FRA आणि PESA अधिनियमाविषयी माहिती जाणून घेतली.या मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष मा. लेतुजी जुनघरे उदघाटक मा. राहुल आत्राम यांनी स्थान भूषविले यांच बरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून. मा. ब्रम्हाणंद देशमुख प्रकल्प संचालक युनिसेक पुणे.मा. मुकेश लोहकरे राज्य संसाधन केंद्र समन्वयक पुणे. मा. गंगाधर आत्राम क्षेत्र समन्वयक आदिम जमाती कक्ष, मा. रसूल शेख केंद्र समन्वयक मा. अजय आत्राम प्रकल्प समन्वयक या सर्व मान्यवरानी पेसा व वनहक्क कायद्या बाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. गणेश आत्राम केंद्र समन्वयक आदिम जमाती सूक्ष्म नियोजन केंद्र यवतमाळ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन मा. कैलास आत्राम यांनी केले या मेळाव्यात प्रामुख्याने मा. नाना मेश्राम सर माथार्जून, मा. तुकाराम आत्राम मुची, मा. पांडुरंग टेकाम, मा. दीपक आत्राम, मा. मारोती आत्राम, मा. प्रकाश जुनघरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच पेसा मोबिलायजर व परिसरातील सर्व नागरिकांनी मेळाव्यात उपस्थिती दर्शवली.
माथार्जून येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा जयंती साजरी माथार्जून येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा जयंती साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.