रानडुकराच्या हैदोसामुळे धानपिकाचे नुकसान..


                             (संग्रहीत फोटो)

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935

सावली : तालुका धान पिकासाठी अग्रेसर असून, तालुक्यातील मुख्य पीक धान आहे. सावली तालुक्यात सध्या कापूस, मक्याचे पीकसुद्धा घेण्यात येत आहे. सध्या सर्वत्र धानपीक कापणी सुरू आहे. मात्र, ऐन कापणीच्या वेळेस डुकराने हैदोस घालणे सुरू केले असून, यामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मजुराची कमतरता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे धान कापणीला विलंब होत आहे. अशातच रानडुकरांनी आता शेतशिवारात उच्छाद मांडला आहे. वाघाच्या दहशतीत शेतकऱ्यांना पिके. वाचविण्याची प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. त्यातच रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागल जावे लागत आहे. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रानडुकराच्या हैदोसामुळे धानपिकाचे नुकसान.. रानडुकराच्या हैदोसामुळे धानपिकाचे नुकसान.. Reviewed by सह्याद्री चौफेर on November 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.