सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
9011152179
सध्या रब्बी हंगाम असल्याने शेतकऱ्यांना सिंचननासाठी लागणारा विद्युत पुरवठा सुरळीत नसुन वारंवार रोज विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरच्या मोटार जळाल्या असल्याचे समोर येत आहे. पीकाला पाहिजे तसे पाणी देता येत नाहीये, त्या प्रमाणात विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या नुकसानीस जबाबदार उंटावरून शेळ्या हाकलणारे मारेगाव विद्युत वितरण विभाग राहणार व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला विद्युत वितरण विभागाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.
रात्री बेरात्री शेतात जात असताना जीव मुठीत घेऊन जावे लागते, सध्या वाघाची दहशत मोठ्या प्रमाणात असतांना शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने विद्युत विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा द्यावा. अनेक वर्षापासून विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ऐन पिक पाण्याच्या वेळातच विजेचा लपंडाव होतो, त्याचा त्रास शेतकऱ्याना सहन करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतनिधींचे शेतकऱ्यांच्या मुद्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकरी मेला काय जगला काय याचे काही देणं घेणं नाही, विजेचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कोलगाव येथील नागरीकांनी मारेगाव वितरण विभागाला दिला आहे, शेतात माल टाल आहे आणि वितरण उप कार्यकारी अभियंता यांना होतं असलेल्या विद्युत पुरवठा लपंडाव दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होतं आहे. याची दखल विद्युत वितरण प्रशासनाने घ्यावी.
यावेळी उपस्थित प्रतीभा ताई तातेड, विलास पारखी, राजू जुनगरी, शालिक अवताडे, अनंता घोटेकर, बलदेव थेरे, अजय आस्वले, रामा गौरकर, मंगेश घोटेकर, संतोष लांबट, गजानन लांबट, प्रशांत घोटेकर, जगणं ढोंगळे, खुशाल कायरकर, तुळशीराम जुनगरी, जगदीश ताजने, रामदास ठक, अतुल पिंपळकर, सुनील पिंपळकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वीज पुरवठा 24 तास द्या - नागरिकांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 15, 2022
Rating:
