Top News

नरसाळा येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 
9359214930

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन येथील विरंगना राणी दुर्गावती महिला उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरवात सोमवार दि.१४/११/२०२२ ला येथील सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन समाजाला प्रबोधनातून मार्गदर्शन होण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटक मा.रामचंद्रजी आत्राम सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गित घोष सर (आदिवासी विचारमंच, साहित्यिक, लेखक,तथा राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.स.ह. परिषद), प्रमुख मार्गदर्शक चेतनजी कुळमेथे सर (प्रदेश अध्यक्ष गोंडवाना युवा जंगोम दल), प्रमुख पाहुणे संतोष पेंदोर सामाजिक कार्यकर्ता,विठ्ठलजी उईके राष्ट्रीय जंगोम दल, येथील सरपंच मा. संगीत मरस्कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे हे मंचावर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गीत घोष यांचे स्वागत वर्षा सुरपाम यांनी पुष्प गुच्छ देवून केले, कार्यक्रमाचे उदघाटक रामचंद्रजी आत्राम यांचे स्वागत उज्वला मडावी यांनी पुष्प गुच्छ देवून केले, प्रमुख मार्गदर्शक चेतन कुळमेथे यांचे स्वागत प्रभाकर उईके यांनी पुष्प गुच्छ देवून केलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अरविंद सिडाम वकील साहेब यांचे स्वागत विवेक तोडसे यांनी केलेत.मा. संतोष पेंदोर  यांचे स्वागत नरेंद्र उईके यांनी केलेत, विठ्ठलजी उईके यांचे स्वागत विलास टेकाम यांनी केलेत, येथील सरपंच यांचे स्वागत रुपेश दडाजे यांनी केले तर तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत बेबीबाई तोडसे यांनी केले. कार्यक्रमांची सुरवात दिप प्रज्वलीत करून व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. मार्गदर्शक यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती देवून आदिवासी समाजाने संघटित होऊन समाज कार्य कसे करावेत यावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. अध्यक्षीय भाषणात गित घोष यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. मंगळवारी सर्व आदिवासी महिला, पुरुष व तरुणांनी समाजाच्या ध्वजारोहाना पासून क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य गावात डीजे सहित वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महिलांनी पिवळ्या रंगाची साडी, लुगडी व पुरुषांनी पिवळ्या रंगाची बंगाली व टीशर्ट घालून मिरवणुकीत आदिवासी एकतेचा संदेश देत क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, अशा थोर क्रांतिवीर पुरुषांच्या जय घोषानी सार गाव जाग झालं. मिरवणीकीत पिवळा रंग हा ह्या मिरवणीकीच विशेष आकर्षण.
 या अगोदर या गावात अनेक मिरवणूका निघाल्यात पण महिला पुरुषांची एवढी मोठी जण संख्या कधीच बघायला मिळाली नसल्याचे येथील वयस्क लोकांच्या तोंडून ऐकायला मिळालेत. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुणांनी ढेमसा नाचगाण्याचा भरघोष आनंद घेत शांततेत मिरवणूक पार पडली. विरंगना राणी दुर्गावती उत्सव समितीने सर्व आदिवासी समाजाचेआभार म्हणून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post