Top News

मच्छिन्द्रा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे जननायक विर बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन येथील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवा सेना समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरवात मंगळवारी दि.१५/११/२०२२ ला "सामान्य ज्ञान स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती, यात ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रथम क्रमांक अंजली आत्राम, द्वितीय अथर्व आत्राम तर तृतीय क्रमांक सौरभ मिलमीले यांनी पटकावला. त्यानंतर सायंकाळी येथील समाज बांधव एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उदघाटक मा श्री रमाकांत पाटील (बि.ज.पोस्टे. मारेगाव), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गित घोष साहेब (आदिवासी विचारमंच, साहित्यिक, लेखक,तथा राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा. स. ह. परिषद), प्रमुख मार्गदर्शक कैलास मेश्राम (सामाजिक कार्यकर्ता),कु. ऋतुजा कुळसंगे, येथील सरपंच मा. प्रशांत सोयाम, पोलीस पाटील डॉ प्रशांत पाटील, मार्डी, माजी सरपंच श्रीधर पेंदोर,हे मंचावर होते. कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु श्रुती मेश्राम तर आभार प्रदर्शन शुभम मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमांची सुरवात दिप प्रज्वलीत करून व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. मार्गदर्शक यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती देवून आदिवासी समाजाने संघटित होऊन समाज कार्य कसे करावेत यावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. अध्यक्षीय भाषणात गितघोष यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. आयोजित क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवा सेना समितीच्या सर्व समाज बांधवाचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमाला युवा समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
Previous Post Next Post