सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोग यांनी केली.
माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका करिता संगणीकृत पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून थेट सरपंच पदासह आरक्षण याप्रमाणे असणार आहे.
सन 2020 ते सन 2025 सरपंच प्रवर्ग पुढील: ग्रामपंचायतीचे नाव :-
वेगांव - सर्वसाधारण - महिला
हिवरी - नामप्र - महिला
नवरगाव - अनुसूचित जमाती - महिला
मार्डी - सर्वसाधारण
वनोजा देवी - सर्वसाधारण - महिला
शिवणी (धोबे) - नामप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
गौराळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला
कानडा - सर्वसाधारण - महिला
कोसारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.