रवी घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव तालुक्यात जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा यांचेवर आज शनिवारला मारेगाव पोलिसात जातीयवादक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.या घटनेने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
मारेगाव येथील महिला व तिचे पती हे मागील जून महिन्यात करणवाडी शिवारात असलेल्या शेत सर्व्हे गट नंबर ११० मधील नागमंदिर नजीक गेले होते.यावेळी संशायित आरोपी हा मंदिरा जवळ येऊन फिर्यादी व तिच्या पतीस जातीयवादक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी महिलेने दाखल केली.
त्यानुसार संशायित आरोपी गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा (रा.वणी ) यांचेवर कलम ३(१) , २९४ , ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.वृत्त लिहेपर्यंत संशयितांस अटक झाली नव्हती.